पुणे

वांद्र्यातील कारवाईला हिंसक वळण

CD

मुंबईत वांद्र्यातील
कारवाईला हिंसक वळण

६० टक्के अतिक्रमण निर्मूलन; दगडफेकीत तीन पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात सुरू असलेल्या पश्चिम रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. जमावाकडून दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत तीन पोलिस जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी काही महिला व तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, आतापर्यंत एकूण ६० टक्के पाडकाम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
गरीब नगर येथील अतिक्रमण हटवण्यासाठी बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी ९च्या सुमारास जेसीबी, पोकलेन आणि ट्रकसह रेल्वेचे पथक दाखल झाले. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला झोपड्या आणि लहान बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत कारवाई सुरळीत सुरू होती; मात्र संध्याकाळी ४च्या सुमारास प्रार्थनास्थळावर कारवाई झाल्याचे वृत्त पसरताच स्कायवॉकखाली मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली, जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. जवळपास अर्धा तास या परिसरात गोंधळ सुरू होता. जमाव शांत होत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दगडफेक करणाऱ्या काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात काही महिलांचाही समावेश आहे.

१,२०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
कारवाईसाठी सुमारे १,२०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये मुंबई पोलिस, आरपीएफ, जीआरपी, दंगल नियंत्रण पथक आणि पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते. कारवाईदरम्यान मानवीय दृष्टिकोनातून विस्थापित कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाची पाकिटे वाटण्यात आली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT