Accident  Esakal
पुणे

Accident : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अवजड कंटेनरचा अपघात; केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची सुटका

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात एका कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात एका कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली. गंभीर जखमी झाल्याने चालकास तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जांभूळवाडी दरीपुल परिसरात घडली.

रावसाहेब पिंगारे असे जखमी झालेल्या कंटेनरचालकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बाह्यवळण महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरीपुलाजवळ मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता पुढे चाललेल्या कंटेनरवर पाठीमागून आलेला अवजड कंटेनर आदळला. पाठीमागील अपघातग्रस्त कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकला होता.

त्याबाबतची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान रेस्क्‍यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी कटरच्या साहाय्याने केबिन कापून अडकलेल्या चालकास बाहेर काढले.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याने रस्ता ही निसरडा झाल्याने अपघातानंतर वाहतूक विस्कळित झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी निसरड्या रस्त्यावर माती टाकली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT