पुणे

न्या. त्रिपाठी नवे मुख्य न्यायाधीश

CD

मुंबई, ता. ६ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याबाबत केलेल्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी (ता. ६) रात्री उशिरा मंजुरी दिली.
न्या. त्रिपाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायाधीश ठरणार आहेत. त्यांनी १९९० मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. २७ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि १० एप्रिल २०१५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास १३ वर्षे कार्यरत असलेले न्या. घुगे यांची या वर्षी जूनमध्ये प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. न्या. घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे सध्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबत गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. या प्रकरणासाठी आता नव्याने पूर्णपीठ स्थापन करावे लागेल आणि प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी लागेल. याचिकाकर्त्यांसह आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सध्या राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT