devendra fadanvis mumbai

 
sakal
पुणे

Devendra Fadanvis : मी मुंबईतच राहणार, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राशी गाठीभेटी : मुख्यमंत्री फडणवीस

दिल्लीतील भेटींनंतर फडणवीसांचा स्पष्ट संदेश; मुंबईतच राहून महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राशी सतत गाठीभेटी

CD

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री म्हणून जाणार असल्याच्या चर्चांना सोमवारी (ता. १७) पूर्णविराम दिला. ‘अनेकांना वाटते की मी दिल्लीत गेले पाहिजे. त्या सगळ्यांना मी सांगतो, की मी मुंबईतच आहे,’ असे स्पष्ट करत फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सांगितले. नवी दिल्ली येथे सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की राज्यातील प्रशासन आणि विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारसोबत काही प्रकल्पांबाबत चर्चा सुरू असून, ते वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. केंद्राकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबतचे पत्रही पंतप्रधानांना दिले आहे. नदीजोड, मेट्रो आदी विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राकडून सहकार्य मिळावे, यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली.

उत्तन-विरार हा सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यासाठी ‘जायका’कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याबाबत सीतारामन यांच्याशी चर्चा झाली. प्रकल्प मोठा असल्याने ‘जायका’सह आणखी एका संस्थेच्या माध्यमातून निधी उभारता येईल का, असा पर्याय त्यांनी सुचविला आहे. या पर्यायाला महाराष्ट्राने होकार दिला असून, त्यातून सकारात्मक मार्ग मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पर्यावरण मंजुरींना गती देण्याचे आश्वासन
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. पर्यावरण आणि वनविषयक काही मंजुरी प्रलंबित असून, काही प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्याबाबत यादव यांना माहिती दिली असून, या मंजुरी वेगाने देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबत उद्योगांच्या संदर्भात बैठक होणार आहे. देशभरातील मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्राच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतींची प्रगती आणि त्यातील अडचणींबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT