पुणे

पालिकेच्या दुटप्पीपणावर न्यायालयाचे ताशेरे

CD

परदेशी पाहुण्यांसाठी शाही थाट
अन् मुंबईकरांच्या माथी कचरा!
महापालिकेच्या दुटप्पीपणावर न्यायालयाचे ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : परदेशी शाही घराण्यातील पाहुण्यांच्या (व्हीआयपी) स्वागतासाठी मुंबईतील रस्ते धुतले जातात, त्यांच्यासाठी परिसर चकाचक केला जातो; मात्र स्थानिक मुंबईकरांच्या माथी कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी मारली जाते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १८) मुंबई महापलिकेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. स्वच्छतेबाबतची तेवढीच तत्परता मुंबईकरांच्या वाट्याला का येत नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी कॅथरिन यांच्या मुंबई भेटीनिमित्त दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील रस्ते स्वच्छ धुऊन आणि रंगरंगोटी केली. महापालिकेने दोन दिवसांसाठी जणू स्वच्छ रस्त्यांचा एक आभासी ‘देखावा’ तयार केला. त्याच वेळी मात्र सामान्य मुंबईकरांच्या वाट्याला रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीचे साम्राज्य असल्याची टीका न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने केली. कांजूरमार्ग कचराभूमीप्रकरणी न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने पालिकेला धारेवर धरले. परदेशी पाहुणे येणार म्हणून बॅलार्ड इस्टेट चकाचक होऊ शकतो,  मग मुंबईतील इतर रस्ते असे स्वच्छ का होऊ शकत नाहीत, असा प्रश्नही न्यायालयाने महापालिकेला केला. तसेच रस्त्यांवर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसारख्या प्रश्नावर न्यायालयाला लक्ष घालावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. महापालिकेने इच्छाशक्ती दाखवल्यास चांगले बदल घडू शकतात, असेही न्यायालयाने सुनावले.
कायमस्वरूपी स्वच्छता का नाही
रस्त्यांवरील कचऱ्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करताना न्यायालयाने सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आक्रमक मोहिमांची आवश्यकताही व्यक्त केली. केवळ दोन दिवसांचा तात्पुरत्या देखाव्याऐवजी, महापालिका कायमस्वरूपी स्वच्छता का राखू शकत नाही? शहरात सर्वत्र स्वच्छता नेहमीच असायला हवी, ती केवळ महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीदरम्यान आणि काही ठरावीक ठिकाणांपुरती मर्यादित नसावी, असेही न्यायालयाने सुनावले.
लेखापरीक्षण अहवाल द्या
कचराभूमीवरून निर्माण होणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणाबाबत देखरेख समितीतंर्गत लेखापरीक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यासाठी न्यायालयाने समितीला १५ दिवसांची मुदत देऊन आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणी सात डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : ओबीसी हॉस्टेल बांधण्यासाठी महसूल विभागाचा जागा देण्याचा निर्णय

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT