पुणे

मुंबईत आंदोलन टाळा ः चंद्रशेखर बावनकुळे

CD

फोटो ः चंद्रशेखर बावनकुळे

गणेशोत्सवात मुंबईत
आंदोलने टाळा : बावनकुळे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १२ : ‘‘गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. या काळात मुंबईत आंदोलने करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत संघटनांनी आंदोलन टाळावे,’’ असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

बावनकुळे यांनी सांगितले, की मराठा आरक्षण, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘ओबीसी’ असो वा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सरकार समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, शासनाला काही वेळ देणे गरजेचे आहे.

राज्यातील १८ जिल्ह्यांत पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की सध्या कोणत्याही आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी चिंताक्रांत असणे हा विषय महत्त्वाचा आहे. पिके करपत असून, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेण्यात आली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर अहवाल सादर करून नियमानुसार तातडीने मदत जाहीर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT