पुणे

पुणे - मुंबई बाजार समिती सचिवपदी डॉ. राजाराम धोंडकर

CD

मुंबई राष्ट्रीय बाजार समितीच्या
सचिवपदी डॉ. राजाराम धोंडकर

शरद जरे यांची तडकाफडकी उचलबांगडी

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः मुंबई राष्ट्रीय बाजार समितीचे सचिव शरद जरे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्यात आल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांची अध्यक्षपदी, तर शरद जरे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. जरे हे पणन संचालक म्हणूनही कार्यरत होते. दोन महत्त्वाची पदे एकाच अधिकाऱ्याकडे देण्यात आल्यामुळे प्रशासनात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी सहकार-पणन विभागातील पदोन्नतीमध्ये संजय कदम यांची पणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याने जरे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला होता.
मुंबई बाजार समितीला शिस्त लावण्यासाठी जरे धडाकेबाज कामगिरी करत असताना त्यांच्या विरोधात काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जरे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. धोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पणन संचालक आणि मुंबई राष्ट्रीय बाजार समितीचे सचिव या दोन्ही उच्च पदांवरून जरे यांना हटविण्यात आल्याबाबत सहकार-पणन विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

(आयकार्ड फोटो ः डॉ. राजाराम धोंडकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT