पुणे

‘पगडी’ इमारती मृत्यूचे सापळे

CD

मुंबईतील ‘पगडी’ इमारती
बनले मृत्यूचे सापळे!

चार लाख रहिवाशांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : मुंबईतील मोडकळीस आलेल्या ‘पगडी’ इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक समितीने सादर केलेल्या अहवालातून शहरातील ‘सेस’ (उपकर प्राप्त) इमारतींमधील भयावह वास्तव समोर आले आहे. घरमालकांचा लोभ, विकसकांचे हितसंबंध आणि प्रशासकीय भ्रष्टाचार यांमुळे सुमारे चार लाख भाडेकरू आजही अत्यंत धोकादायक घरांमध्ये जीव मुठीत धरून राहत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
समितीच्या निष्कर्षानुसार, मुंबईत अजूनही १२,५५२ सेस इमारती आहेत. यातील बहुतांश इमारती ब्रिटिश काळात बांधल्या गेल्या असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. वारंवार दिल्या जाणाऱ्या नोटिसा आणि तांत्रिक धोके असूनही, मालक आणि विकसक यांच्यातील वादामुळे या इमारतींचा पुनर्विकास वर्षानुवर्षे कागदावरच राहिला आहे. ​मालक पुनर्विकास करीत नसल्यास म्हाडाने कलम ७९-अ अंतर्गत ९३५ नोटिसा बजावल्या होत्या; मात्र ही कायदेशीर प्रक्रिया रहिवाशांना न्याय देण्याऐवजी खटले आणि विलंबाचे कारण ठरली आहे. गळकी छपरे आणि तडे गेलेल्या भिंतींच्या सावलीत राहणाऱ्या रहिवाशांच्या जिवापेक्षा मालक आणि बिल्डरांना स्वतःच्या नफ्याची अधिक चिंता असल्याचे ताशेरे समितीने ओढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

SCROLL FOR NEXT