सलमान खान  सकाळ
पुणे

सलमान खान धमकी प्रकरण : सौरभ महाकाळची मुंबई पोलिसांकडून चौकशी

सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये काल अटक केली होती.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या सौरभ कांबळे उर्फ ​महाकाळची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक पुण्यात पोहोचले आहे. धमकीच्या पत्राची चौकशी करण्यासाठी आम्ही पुण्यात आलो आहोत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रमासिंह निशाणदार यांनी सांगितले. (Salman Khan Threat Letter )

ते म्हणाले की, बांद्रा पोलीस ठाण्यात सलमान खानला आलेल्या धमकीबद्दलच्या पत्राबाबत गुन्हा दाखल असून, त्याबाबत सौरव महाकाळची चौकशीसाठी आम्ही आलो आहोत. सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये काल अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

महाकाळ हा शूटर संतोष जाधवचा साथीदार असून, गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोक्का कायद्यांतर्गत २०२१ मध्ये झालेल्या खून प्रकरणात महाकाळला काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ओंकार बाणखुले यांच्या हत्येप्रकरणी सौरव महाकाळला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी रविवारी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारे एक स्वाक्षरी नसलेले पत्र रविवारी मुंबईतील वांद्रे बॅंडस्टँड जवळ आढळले. पोलीस सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हिंदीतील पत्रात असे म्हटले आहे की, सलीम खान आणि त्यांचा मुलगा या दोघांचेही लवकरच दिवंगत गायक सिद्धू मूसवाला होईल असे नमुद करण्यात आले होते. दरम्यान या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT