Mumbai Pune Highway sakal
पुणे

Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग आज जड वाहनांसाठी २ तास बंद

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वडगाव आणि खंडाळा हद्दीत येत्या गुरुवारी (ता.७) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत गॅंट्री बसविण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वडगाव आणि खंडाळा हद्दीत येत्या गुरुवारी (ता.७) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत गॅंट्री बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या महामार्गावरील अवजड वाहनांसह सर्व चारचाकी वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्घीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव आणि खंडाळा या दोन केंद्रांच्या हद्दीत ही गँट्री उभारण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई मार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक आणि छोटी चारचाकी वाहने (कारसह ) किवळे पुलावरून जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेकडे जातील आणि पुणे ते मुंबई या जुन्या महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने ही कुसगाव टोल नाका येथून द्रुतगती महामार्गावर सोडली जाणार असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

Mumbai News: सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती बँकॉकहून आली; मुंबईत थेट कस्टमच्या जाळ्यात अडकली, प्रसिद्ध मॉडेलवर मोठी कारवाई

ST Employees Protest: प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको, प्रताप सरनाईकांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT