पुणे

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!

CD

मुंबईत १५ मेपासून १० टक्के कपात
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ११ : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात झालेली घट आणि आगामी पावसाळ्याबाबतचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेत महापालिकेने संपूर्ण मुंबईत शुक्रवारपासून (ता. १५) १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. ​महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांतील ​आजचा साठा तीन लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लिटर इतका आहे. मुंबईची पाण्याची वार्षिक गरज १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या घाबरण्याचे कारण नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे; ​मात्र वाढते तापमान, बाष्पीभवन आणि ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजनावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT