Crime_Arrest 
पुणे

बंदुकीचा धाक दाखवत गल्ल्यातली रोकड पळवली; पोलिसांनी दोघांना केली अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'तुम्हारे पास बीस लाख रुपये आया हे,' असे म्हणत व्यावसायिकाच्या पोटास पिस्तूल लावून दुकानाच्या गल्ल्यातील रोकड चोरल्या प्रकरणी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवीण ऊर्फ दादा सतीश पवार (वय 36, रा. माळवाडी, मांजरी) आणि संदीप ऊर्फ राम बापू वाघ (वय 31, ता. गोपाळपट्टी, मांजरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख 17 हजार 200 रुपये, 25 हजार रुपये किमतीचे पिस्तूल, एक हजार रुपयांचे पाच जिवंत काडतूस आणि 40 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 82 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी जालाराम प्रभुजी प्रजापती (वय 45, रा. झेड कॉर्नर जवळ मांजरी) मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचा टिंबर मार्केटमध्ये लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 30 ऑक्‍टोंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी हे प्रजापती यांच्या दुकानात आले. 'तुम्हारे पास बीस लाख रुपये आया हे,' असे म्हणून त्यांनी फिर्यादींच्या पोटाला बंदूक लावली. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यात असलेली 44 हजार 500 रुपयांची रोकड चोरून पळ काढला.

पोलिस चोरट्यांचा शोध घेत असताना हा गुन्हा पवार याने वाघच्या मदतीने केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ पाचचे पोलिस उप आयुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस अंमलदार नाना भांदुर्गे, दिनेश राणे, दत्ता विभूते, दीपक कांबळे, महेश पाठक, स्वप्नाली आंबले, नीलेश पालवे यांनी ही कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT