Municipal administration protested by TB employees wearing black ribbons due to non-payment of risk allowance  sakal
पुणे

Pune News : क्षयरोग कर्मचाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाचा निषेध

जोखीम भत्ता न मिळाल्याने काळ्या फिती लावून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या विविध दवाखान्यात कंत्राटी पद्धतीने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या ५९ कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता न मिळाल्याने, आज सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध म्हणून काम केले. जोखीम भत्ता न मिळाल्यास मंगळवार (ता:२८) फेब्रुवारी पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे.

तरी देखील न्याय न मिळाला तर, एक मार्च पासून असहकार आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना पुणे महापालिका यांनी शहर क्षयरोग अधिकारी महापालिका यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . महापालिकेच्या २०२१ साली झालेल्या स्थायी समितीच्या ठरावात संबंधित कर्मचाऱ्यांना सदोतीस लाख ऐंशी हजार रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तरी देखील हे अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता मिळावा यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश दिले आहेत. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT