Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune News : उपअभियंत्याकडे सापडले बंडल; पण ना चौकशी, ना नोटीस

उपअभियंत्याकडे पैसे सापडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेत उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून ५०० रुपये मोठेच्या मोठे बंडल सापडून २४ तास उलटून गेले. मात्र, त्यानंतरही निर्ढावलेल्या महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. पैसे सापडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे. तरीही या प्रकरणाची साधी चौकशी किंवा संबंधित उपअभियंत्याकडून खुलासा मागण्याची तसदी अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.

महापालिकेत पथ विभागात उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवल्याचे आपचे पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्ष रविराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी समोर आणले. त्यावेळी त्यांनी या उपअभियंत्यास हे पैसे कोणी दिले असे सांगितल्यावर त्यांनी हे ठेकेदाराने ठेवण्यास सांगितले आहे, तो काही वेळाने घेऊन जाणार आहे असे सांगत आहे.

पण तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले, ठेकेदार कोण आहे यावर ते काहीच स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. पण आज (ता. ६) दिवसभरात काहीच झालेले नाही. पथ विभागातील अधिकाऱ्यांना हा विषय माहिती असूनही या उपअभियंत्यास खुलासा करण्यास सांगितले नाही. याबाबत विचारणा केल्यास आम्ही काहीच बोलणार नाही असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. उलट काही लोकांनी आमच्या या अधिकाऱ्याला फसवले आहे, तो खूप चांगला आहे असे करत त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु झाला आहे.

दरम्यान, रविराज काळे म्हणाले, ‘या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, यानंतर या विभागाचे अधिकारी जबाब घेण्यासाठी येणार आहेत.’

नव्या अभियंत्याचा ‘आदर्श’

महापालिकेत कोणत्याही अधिकाऱ्यांचा हिरवळीवर वाढदिवस साजरा केला जात नाही. पण या उपअभियंत्याने नव्याने नियुक्त झालेल्या सुमारे १०० कनिष्ठ अभियंत्यांना एकत्र करून चक्क महापालिकेतील हिरवळीवर केक कापून स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी त्यास सुरक्षा विभागाकडून समज देण्यात आली होती. त्यानिमित्ताने हा उपअभियंता या सर्वांचा नेता होण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.

मोठ्या ठेकेदाराकडून वाटप

मार्च अखेर जवळ आल्याने ठेकेदारांना त्यांच्या कामाची बिले काढून घेण्याची गडबड सुरु झाली आहे. त्यातच या उपअभियंत्याला माजी आमदाराच्या संबंधित कंपनीकडून हे नोटांचे बंडल देण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

Jalgaon Municipal Elections : भाजपची मास्टरस्ट्रोक 'खेळी'! मंगेश चव्हाण प्रभारी तर सुरेश भोळे निवडणूक प्रमुख; महाजनांकडे 'रिमोट कंट्रोल'

Latest Marathi News Live Update: गाडीत मराठी अनाउन्समेंट न झाल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक

Nrusinhawadi Tax : थकबाकीदारांना सवलत, प्रामाणिक करदात्यांना ठेंगा; शासन निर्णयावर नागरिकांमध्ये संताप

Agriculture News : डाळिंब-उसाकडे फिरवली पाठ! कसमादे पट्ट्यात पुन्हा 'कांदा एके कांदा'चा नारा

SCROLL FOR NEXT