Ajit Pawar  esakal
पुणे

Khadakwasla News : समाविष्ट ३४ गावातील कर गोळा करणे थांबवा, लोकांना त्रास देऊ नका; उपमुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

महायुतीचे सरकार शास्ती कर संदर्भात काढणार जीआर

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावातील कराच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना सांगितले की, ‘सध्या शास्ती कर गोळा करणे थांबवा, लोकांना त्रास देऊ नका. कर वसुली करण्याच्या भानगडीत लगेच पडू नका.’

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असणारे आमचे महायुतीचे सरकार याबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न यासाठी करीत आहेत. यदाकदाचित लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यास या संदर्भातला शासन निर्णय ‘जीआर’ काढता येणार नाही. परंतु लोकसभा निवडणुका झाल्यास आम्ही तातडीने ‘जीआर’ काढणार आहे.

त्यातून मार्ग काढू. काळजी करू नका. निवडणुकीच्या वेळेस कोणी काही तरी माहिती सांगेल. त्याचं काही खरं नाही. शेवटी सरकार आपले आहे. आपण तिथे काम करतोय. त्यातून जनतेचे असे प्रश्न सोडवणार आहोत. असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३४ गावातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

वारजे येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव तापकीर यांनी ३४ गावांचा समावेश महापालिकेत झालेला आहे. या ठिकाणी सध्या शास्तीकर तिप्पट घेतला जात आहे. याबाबत ३४ गावातील नागरिकांना योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही ३४ गावातील प्रतिनिधीच्या सोबत भेटलो. त्यावेळेस पवारांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल तापकीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर सभेत आभार मानले.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या शास्ती कराचा प्रश्न ऐरणीवर आहे. अधिवेशन सुरू असताना चंद्रकांत पाटील आणि मी या संदर्भात बैठक बोलावली. पिंपरी चिंचवड महापालिकेत शास्ती कर जीआर काढला. पुणे महापालिकेत देखील अशाच पद्धतीने शास्ती करासंदर्भात जीआर काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल.

दरम्यान, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे व न्यू कोपरे नागरी कृती समितीने आज वारजे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर यांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT