municipal corporation meeting bjp members low attendence notice
municipal corporation meeting bjp members low attendence notice 
पुणे

पुणे महापालिकेत भाजप तोंडघशी; नगरसेवकांना नोटीस पाठवण्याची आली वेळ

सकाळ डिजिटल टीम

पुणे Pune News : पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात प्रशासनाने सुचविलेल्या ११ टक्के करवाढीच्या प्रस्तावावर बोलाविलेल्या विशेष सभेत भाजपला त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनीच ऐनवेळी अडचणीत आणले. पुरेशा गणसंख्येअभावी ही सभा तहकूब झाली असती, तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता. त्यामुळे एकीकडे चर्चेच्या बहाण्याने वेळकाढूपणा करीत, दुसरीकडे नगरसेवकांना संपर्क साधत सभेतील उपस्थिती वाढल्यामुळे पक्षावरची नामुष्की टळली. परंतु, या सभेला अनुपस्थित राहिलेल्या २७ नगरसेवकांना सभा संपताच पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली.

जेमतेम 10-15 सदस्य
पुढील वर्षीच्या मिळकतकरात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. नेहमीप्रमाणे ऑनलाइन सभेला दुपारी तीन वाजता सुरूवात झाली. त्यावेळी पक्षाचे जेमतेम १० ते १५ सदस्य उपस्थित असल्याचे लक्षात आले. गणसंख्येअभावी सभा तहकूब करावी लागेल, हे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी माईक बंद करून विरोधी पक्षाबरोबर चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण केले. त्याचवेळी दुसरीकडे पक्षाच्या कार्यालयातून नगरसेवकांना दूरध्वनी करून तातडीने ऑनलाइन सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सुमारे अर्धा तासानंतर उपस्थितीचा आकडा ४७ वर गेला. त्यानंतर लगेच सभेचे कामकाज सुरू केले. चर्चा सुरू असताना आणखी काही सदस्य सभेला हजर झाले आणि संकट टळले. मात्र, सभा संपताच सभेला गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT