पुणे

‘असुरक्षित’ इच्छुक

सलील उरुणकर -@salilurunkar

निवडणुका जवळ येत आहेत तसा प्रचाराचा वेगही वाढणार आहे. प्रभागामध्ये झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची चांगलीच गोची झाली आहे. नव्याने जोडलेल्या भागातील मतदार ओळखत नाहीत आणि ज्या भागात काम करणे अपेक्षित होते तिथे मतदारांनी चांगलेच ‘ओळखून’ घेतले आहे.

त्यामुळे आता पुन्हा मते मागण्यासाठी सोसायट्यांमध्ये फिरून ‘प्रभाग रचनेत माझ्यावर अन्याय झाला आहे’, असे भावनिक आवाहन करण्यापलीकडे फारसा पर्याय राहिलेला नाही. अशाच एका इच्छुकाने काही सोसायट्यांमध्ये दौरा केला आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यास सुरवात केली. 

पण प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवारानेही त्याच सोसायट्यांमधील मतदारांना विविध ऑफर देऊन ‘जवळ’ केले. त्यामुळे असुरक्षित झालेल्या इच्छुकाने पुन्हा सोशल मीडियावरच आगपाखड करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर पूर्ण माहितीच टाकणार नाही अशी विचित्र भूमिका या इच्छुकाने घेतली आहे. माहिती टाका किंवा नका टाकू, ऑफर द्या नाहीतर बैठका घ्या.. मतदारांनी त्यांचा विचार पक्का केला आहेच.. त्यामुळे मतदार कोणाची ऑफर स्वीकारणार आणि कोणाला कायमचे असुरक्षित करणार हे येत्या काही दिवसांत कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात खळबळ ! ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप

Talathi Office Bribery : वडिलांचे नाव लावायला उपसरपंच, तलाठ्याने गाठली खालची पातळी, ‘लाचलुचपत’ पथक आलं शेतकऱ्याच्या मदतीला

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; रुग्णांना आर्थिक फटका

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Sangli Property Card : सदनिकाधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून हालचाली, कायद्याच्या अभ्यासासाठी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT