पुणे

पुण्यात पालिका कर्मचाऱ्याचा बेडअभावी कोरोनाने मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

रामवाडी : नगररोड क्षेत्रीय कार्यालय कीटक प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी अमोल गायकवाड (वय 36) यांना कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतू वेळेवर बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचा काल मृत्यू झाला. 

गायकवाड यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी रुबी हॉल येथे नेण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यत त्यांना बाह्यरुग्ण  विभागात ठेवण्यात आले होते. 

त्यानंतर वायसीएम पिंपरी चिंचवड येथे व्हेंटिलेटर बेडसाठी चौकशी करण्यात आली. तिथे बेड उपलब्ध नव्हता. अखेर त्यांना चिंचवड येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम कोविड सेंटर येथे नेण्यात आले. परंतू त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यापासून अहोरात्र काम करणारे हे कर्मचारी ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण असतात त्या ठिकाणी जाऊन औषध फवारणी करण्याचे काम करतात. घरे, सोसायटया, शासकीय इमारती, पोलिस चौकी, कोविड सेंटर, विद्युत विभाग अशा  ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास हे कर्माचीरी त्या ठिकाणी जाऊन फवारणी करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत असतात. हा मृत्यू झाल्याने कीटक प्रतिबंध विभागात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT