Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

आरोग्य विभागाला पाजला शिस्तीचा ‘डोस’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करणाऱ्या महापालिका रुग्णालये आणि मुख्य कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेने शिस्तीची ‘डोस’ दिला आहे. रुग्णांना बाहेरची औषधे विकत घेण्याचा सल्ला न देण्याची तंबीही प्रभारी आरोग्य प्रमुखांनी दिली आहे. महापालिकेकडूनच रुग्णांना औषधे द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

शहरातील महापालिकेच्या ७१ रुग्णालये आणि दवाखान्यांत रोज साधारपणे १२ हजार रुग्णांची नोंद होते. त्याशिवाय त्यांच्या नातेवाइकांचीही वर्दळ असते. मात्र डॉक्‍टर आणि अन्य कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना ताटकळ राहावे लागते. शहरी गरीब योजनेतील रुग्णांना औषधे नसल्याची कारणे देत, बाहेरून औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. औषधे विकत घेणे शक्‍य नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.  

विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी नोंदणी करण्यास रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे चित्र वारंवार दिसते. तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयात नागरिकांना दाखले देण्यास कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. कार्यालयीन कामकाज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत असतानाही बहुतांश अधिकारी-कर्मचारी वेळेत येत नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली आहेत. विशेषत: अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात येण्याबाबत बजाविले आहे. त्याबाबत रुग्णालय आणि दवाखान्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.

रुग्णांची नोंदणी व उपचार करणारी यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्यांदा वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व घटकांना केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई होईल.
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT