पुणे

पालिकेच्या नाकर्तेपणामुळे रात्र पाण्यात

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - पावसामुळे शनिवारच्या रात्रीपासून आम्ही पाण्यात आहोत. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे ही परिस्थिती आमच्यावर ओढावली आहे, असा संताप एकतानगरी परिसरातील महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

या परिसरात राहणाऱ्या स्नेहल केसकर, उमा दांडेकर, स्मिता पाटील, ज्योती भोळे, नंदा कांबळे, कावेरी जगताप, सुरेखा पिंगळे यांनी आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे वीज नाही. याला केवळ महापालिका जवाबदार आहे. महापालिकेच्या नाकर्तेपणाची शिक्षा आम्ही भोगत असून, आज आम्हाला पाण्यात आणि काळोख्या अंधारात रात्र काढावी लागत आहे. जीव टांगणीला लागला आहे. आमची ही हानी कोण भरून देणार?’’ 

 या परिसरात शारदा सरोवर, शामसुंदर, जलपूजन, जलतरंग, जलविहार, द्वारका, साईसिद्धार्थ, आनंद पार्क, राज अपार्टमेंट, कुदळे पाटील गार्डन, राधाकृष्ण रेसिडेन्सी, पूजा पार्क आदी सोसायट्या आहेत. सर्व सोसायट्यांत मिळून सुमारे ४५० कुटुंबे आहेत. ‘‘या परिसरात विठ्ठलवाडी वारजे नदीकाठचा रस्ता करण्यात आला होता. या रस्त्याचा भराव काढण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला. त्यानुसार महापालिकेने रस्ता उखडला. मात्र, त्याचा सुमारे तीस टक्के राडारोडा उचलून न नेता तो नदीपात्राच्या बाजूलाच टाकला. तोच राडारोडा सोसायट्यांच्या बाजूने टाकला गेला असता तर आज परिसरात पाणी शिरले नसते. त्या राडारोड्यामुळे नदीपात्रातील पाणी अडविले गेले. परिणामी, नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे,’’ असेही या महिलांनी सांगितले. 

नदीपात्रात राडारोडा टाकल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती दिली, तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून परिसरात संरक्षक भिंत घालून द्यावी.
- सोमनाथ गिरी, अध्यक्ष, एकतानगरी रहिवासी संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT