पुणे

किरण काळे

CD

व्यापारी संकुले
‘बीओटी’ विकसित करा
किरण काळे ः कर्जाचा कटोरा घेऊन मनपा बँकांच्या दारात
अहिल्यानगर, ता. १५ ः महापालिकेने सुमारे ११४ कोटींच्या पाच व्यापारी संकुलांसाठी सुमारे ८६ कोटींचे कर्ज घेणार आहे. कोट्यवधींचे कर्ज घेऊन विकासाच्या नावाखाली भविष्यातील आर्थिक संकटाचे बीज पेरत आहे. नगरकरांना कर्जबाजारी करण्याऐवजी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुले विकसित करावीत, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
नेहरू मार्केट, सर्जेपुरा रंगभवन, प्रोफेसर कॉलनी चौक, जुने एनसीसी कार्यालय आणि गंजबाजार येथील व्यापारी संकुलांसाठी कर्ज घेण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर हे विषय ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्या आधीच मनपाने बँकांकडून प्रस्ताव मागणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या आहेत. हे म्हणजे, आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातयं, अशी अवस्था आहे. प्रकल्प उभारण्यासाठी स्वहिश्याची रक्कम उभारण्याची आर्थिक क्षमता महापालिकेकडे नाही. घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, अशीच अवस्था महापालिकेची झाली आहे. शहराला कर्जबाजारी करणारे चुकीचे आर्थिक सल्ले देणारा, दबाव आणणारा तो तज्ज्ञ कोण आहे, याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharne on Sugar Prices : साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे मत

Koyna Dam Water Level: कोयना धरण आज 100 टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता;धरणात किती आहे पाणीसाठा वाचा

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Marathi News Live Updates : राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शाळांमधील फोटो आणि व्हिडिओग्राफीवरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

SCROLL FOR NEXT