Pune-Municipal 
पुणे

Coronavirus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या पालिका अधिकाऱ्यांनीच टाळले विलगीकरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑस्ट्रेलियाहून पुण्यात आलेल्या महापालिकेतील तीन अधिकारी विलगीकरण कक्षात दाखल न होताच कामावर रूजू झाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी पुण्यात येऊन चार दिवस झाले तरी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला त्याचा थांगपत्ताच नव्हता. 

दरम्यान, या बेजबाबदार अधिकाऱ्यांना प्रशासनाने नोटिसा बजाविल्या आहेत. एका प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापालिकेतील अभियंता पदावरील तीन अधिकारी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ते शनिवारी (ता. १४ ) पुण्यात आले.

महापालिकेने त्यांना विमानतळावरून विलगीकरण कक्षात नेणे अपेक्षित होते; मात्र ना महापालिका, ना अधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षात जाण्याचे कष्ट घेतले नाही. पुण्यात येताच तिन्ही अधिकारी घरी गेले आणि त्यानंतर ते कामावरही रुजू झाले. ही बाब मंगळवारी निदर्शनास आली तेव्हा, त्यांना विलगीकरण कक्षात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मला चामड्याच्या पट्ट्याने मारलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

Latest Marathi Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

SCROLL FOR NEXT