Pune Municipal
Pune Municipal Sakal
पुणे

वैद्यकीय खर्च वाढल्याने भांडवली तरतुदींना महापालिकेची कात्री

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) वैद्यकीय कामांवर (Medical Work) खर्च (Expenditure) करावा लागत असल्याने भांडवली विकासकामांवरील तरतूद सरकट दहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने (Municipal) घेतला आहे. गेल्या वर्षी नऊ मार्च रोजी शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण (Corona patient) पुण्यात सापडला. त्यानंतर २३ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले. त्याचा फटका उद्योग-व्यवसायांना जसा बसला, तसा महापालिकेच्या उत्पन्नाला (Income) देखील बसला. (Municipal scissors to capital provisions due to increase in medical expenses)

स्थायी समितीने चालू आर्थिक वर्षात ८ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न गृहीत धरून अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये सुमारे चार हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद भांडवली विकासकामांवर केली आहे. मात्र मार्चपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एप्रिल महिन्यात या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेवरील खर्चात वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सर्व प्रकारच्या भांडवली विकासकामांवरील खर्च सरसकट दहा टक्क्यांनी कपात करावा, अशा सूचना त्यांनी पत्राद्वारे सर्व खाते प्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे हा सर्व निधी कोविड केअर सेंटर, महापालिकेचे दवाखाने, जम्बो हॉस्पिटल यांच्यासाठी वळविल्याचे पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी

जायका, नदी सुधार, मेट्रो प्रकल्प, एचसीएमटीआर रस्ता, शिवणे-खराडी रस्ता, समान पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा प्रकल्पांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. सध्याची गरज लक्षात घेऊन सरसकट दहा टक्के तरतूद कपात केली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता हे वर्ष पालिकेसाठी अडचणीचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT