नेहरुनगर, पिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्य कोठारात वर्गीकरण करून ठेवलेल्या भंगार मोटारी, फिरते स्वच्छतागृहे व अन्य भंगार साहित्य. 
पुणे

महापालिकेचे भंगार कोठार ‘फुल’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या भंगार साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला विलंब होत असल्याने नेहरूनगर कोठार पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे विविध विभागांकडील भंगार साहित्य स्वीकारणे महापालिकेच्या भांडार विभागाने बंद केले असून, संबंधित विभागांच्या कार्यालयांमध्येही भंगार वाढू लागले आहे. 

महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे शहरात विविध ठिकाणी कार्यालये आहेत. त्यात दवाखाने, करसंकलन कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. येथील टेबल, खुर्च्या, वाहने व अन्य भंगार साहित्य भांडार विभागाकडे जमा करावे लागते. हे सर्व निरुपयोगी व भंगार साहित्य ठेवण्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे व्यवस्था केली आहे. तेथील कोठारात भंगार साहित्याचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर लिलाव करून साहित्याची विक्री केली जाते. सध्या कोठारात वेगवेगळे भंगार साहित्य वर्गीकरण करून ठेवलेले असून त्याची लिलाव प्रक्रिया अद्याप झालेली नाही. 

विविध विभागांना सूचना
नेहरूनगर कोठारात यापूर्वी जमा झालेल्या भंगार साहित्याचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. त्याचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी सर्व भंगार साहित्य वर्गवारी करून ठेवलेले आहे. आणखी भंगार साहित्य घेणे स्थगित केलेले आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांच्याकडील भंगार साहित्य नेहरूनगर कोठारात जमा करण्यासाठी पाठवू नये, असे भांडार विभागाने महापालिकेच्या सर्व विभागांना कळविले आहे.

नेहरूनगर गोदामात भंगार साहित्य ठेवण्यास सध्या जागा नाही. आता असलेल्या भंगार साहित्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांकडील भंगार साहित्य कोठारात ठेवण्यासाठी स्वीकारले जाईल. 
- रवींद्र शीलवंत, भांडारपाल, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT