Semi-English 
पुणे

महापालिकेच्या सेमी इंग्रजीचा फज्जा

आशा साळवी

पिंपरी - महापालिका शाळांमधील पटसंख्या टिकविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ८० शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’चे वर्ग सुरू करण्यात आले; परंतु केवळ अन्‌ केवळ शिक्षकांच्या उदासीनतेमुळे त्यातील ३९ वर्ग बंद पडले आहेत. 

गेल्या काही वर्षांत पालकांचा मुलांना इंग्रजी शाळेत पाठविण्याचा कल वाढल्याने महापालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या घटू लागली. त्यावर उपाययोजना करताना शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी २००८ मध्ये महापालिकेच्या ९० शाळांमध्ये ‘पाचवीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग’ सुरू केले. त्यानंतर माजी सभापती फजल शेख यांनी २०१२ मध्ये ८० शाळांमध्ये पहिली ते सातवी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. आजच्या घडीला त्यातील ४१ शाळांमध्ये काहीच वर्गांना सेमी इंग्रजीतून शिकवले जात आहे. 

जाधववाडी कन्या व मुले या दोन प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते, तर सात शाळांमध्ये फक्त पहिली व दुसरीचे वर्ग सेमी भरतात. खिंवसरा पाटील शाळेत सहावी वर्ग तर वाकड शाळा क्रमांक ५७/१ मध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांना सेमी इंग्रजीतून शिकवण्यात येते. कस्पटेवस्ती शाळा क्रमांक ५९ मध्ये ३५ मुलांचा पहिलीचा वर्ग सेमीमधून भरतो. भूमकरवस्ती कन्या व यशवंतनगर शाळेत दुसरीचा, खराळवाडी शाळेत पाचवी व सहावीचा वर्ग सेमीतून भरतो. शिक्षण मंडळाचे ढिसाळ नियोजन आणि उदासीन शिक्षक यामुळे वारंवार सेमी इंग्रजीचा फज्जा उडत आहे.

सेमी इंग्रजी वर्गासाठी लाखो रुपये खर्च करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. शिक्षकांना सेमी इंग्रजीतून गणित, विज्ञान हे विषय शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, शिक्षकांच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
- बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

सेमी इंग्रजीच्या शाळा
 जाधववाडी कन्या व मुले
 खिंवसरा पाटील
 वाकड शाळा क्रमांक ५७/१
 कस्पटेवस्ती शाळा क्रमांक ५९
 भूमकरवस्ती कन्या 
 यशवंतनगर
 खराळवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT