municipality construction development department zone 2 action on unauthorized construction in Yevlewadi Sakal
पुणे

Pune News : येवलेवाडीत अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

येवलेवाडी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत २ हजार चौरस फूट पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : येवलेवाडी परिसरातील सर्वे क्रमांक ३० मधील हिल टॉप हिल स्लोप क्षेत्रामधील तीन अनाधिकृत बांधकामांवर पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन २ च्या वतीने कारवाई करण्यात आली. परिसरातील ३ हजार चौरस फूटावर बांधण्यात आलेले २४ गोडाऊनच्या माध्यामांतून ३८००० चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

तसेच, येवलेवाडी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत २ हजार चौरस फूट पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी २ जेसीबी, गॅस कटर व अतिक्रण विभागाकडील ९ बिगारी मजूरांचा वापर करण्यात आला. अनधिकृत बांधकामे थांबवावीत याबाबतची नोटीस देऊन बांधकामे सुरूच ठेवल्याने सदरील कारवाई अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे उपअभियंता राजेश खाडे,

उपअभियंता विजय कुमावत, इमारत निरीक्षक उमेश गोडगे, विक्रम क्षिरसागर, सुरेखा बनसोडे यांच्या पथकाने केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिक्रमण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती झांजरे यांच्यासह अतिक्रमण विभागाकडील पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने बंदोबस्त ठेवला होता.

लोकांनी कोणत्याही जागेची किंवा व्यावसायिक दुकानाची खरेदी करताना महापालिकेच्या सर्व परवानग्या तपासून घ्याव्यात. तसेच अनाधिकृत ठिकाणी खरेदी करु नये. कोणीही अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम करु नये. यापुढेही अशाप्रकारे अाधिकृत बांधकामांवर नियमीत कारवाया करण्यात येणार आहेत.

- राजेश खाडे, उपअभियंता, बांधकाम विकास विभाग झोन-२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi highway landing: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाचे हायवेवर आपत्कालीन लँडिंग, थरारक Video पाहा

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री रणजीत देशमुख यांना बजावलेला अजामीन पात्र अटक वॉरंट रद्द

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

SCROLL FOR NEXT