Ajit Pawar 
पुणे

'गाफील राहू नका' अजित पवारांचा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना सल्ला

मुठा नदीवरील दीड- कोटी खर्चाचे शिवणे- नांदेड पुलाचे रुंदीकरण जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांच्या पुढाकाराने झाले

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : निवडणूका सहा महिने पुढे गेल्या. असे काही सांगता येत नाही. प्रभाग तीन सदस्यांना ऐवजी दोनचा होईल का, सदस्य संख्या तिनचीच राहणार. पालिकेची आज मुदत संपत असल्याने निवडणुक होईपर्यंत लढणाऱ्यांना थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. पुढील काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहिर होतील. हे मी आज सांगतो. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर आम्हाला फसवलं राव, असं मला तुम्ही दोष देऊ नका. म्हणून मी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका. असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवणे येथे बोलताना व्यक्त केले.

मुठा नदीवरील दीड- कोटी खर्चाचे शिवणे- नांदेड पुलाचे रुंदीकरण जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांच्या पुढाकाराने झाले. त्याचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, दीपाली धुमाळ, दिलीप बराटे, सचिन दोडके, बंडू गायकवाड, काका चव्हाण, सायली वांजळे, माजी आमदार कुमार गोसावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण, शिवसेनेचे मतदारसंघ प्रमुख नितीन वाघ, शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी,शेखर दांगट, विकास दांगट, प्रविण शिंदे, राहुल घुले, सुरेश गुजर यावेळी उपस्थित होते. यावेळी आभार अतुल धावडे यांनी मानले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजा(ओबीसीं)ना पण न्याय मिळाला पाहिजे. त्याकरता आमचा खटाटोप आहे. या संदर्भातील विधेयक एकमताने सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने दोघांनी पण त्याला पाठिंबा दिला. राज्यपाल महोदयांनी पण त्याच्यावर सही केलेली आहे. परंतु शेवटी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे. त्यामुळे पुढे कदाचित कोणी कोर्टामध्ये जाऊ शकतात. कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. पण तुम्ही कृपा करून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका. येत्या काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहिर होतील. प्रभागाच्या हरकती- सूचना निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत. आणि कदाचित तुम्ही फिरायला जाताल. निवडणुक लढणाऱ्याला थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. कारण निवडणूकेला किती दिवस आहे. ते आता सांगता येत नाही. त्याच्यामुळे हात आखडता घेतला. असे ही काही नंतर सांगू नका. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना म्हणाले, मला आठवतंय अगदी सुरुवात काळामध्ये आपल्या जिल्हाच्या नियोजन समितीला चाळीस कोटी रुपये दरवर्षी मिळायचा. माजी आमदार कुमार गोसावी येथे आहेत. त्यांना आठवत असेल. कुमारभाऊ आता यंदाच्या वर्षी मी आपल्या जिल्ह्याला 850 कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेला दिलेला आहे. हे लोकसंख्येच्या प्रमाणावर असतं. परंतु देत असताना शेवटी तुम्हाला माहिती असेल. आपल्या जिल्ह्याला थोडा जास्त टाकायचा प्रयत्न करणं हा मनुष्य स्वभाव आहे. तरीपण जेवण वाढत असताना ओळखीचा असेल तर दोन पळ्या जास्तच टाकायचा प्रयत्न करतो. काही चुकीचं करतोय असं नाही, शेवटी चांद्यापासून बांद्यापर्यंत देत असताना राज्यातील ३६ जिल्ह्याला मिळाले पाहिजे आणि याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. हे मला स्पष्टपणे सांगायचे आहे. असे पवार म्हणाले.

सध्या राजकीय वातावरण गढूळ झालेले आहे. विकासाच्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढणे. एकमेकांना नोटिसा पाठवण सुरू आहे. हे कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते का, तुम्ही पण कधी बघीतल असेल. सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी चालू ठेवलेली परंतु आताचे वातावरण वेगळे आहे. काही लोक ज्यांची योग्यता पात्रता नाही. ते तर येवढ्या मोठ्या माणसांच्या बद्दल काय बोलतात काय, करतात काय, त्याचा मागमूस राहिलेला नाहीये. माझं म्हणणं प्रत्येकाने आधी स्वतःपासून वडील- धाऱ्यांचा आदर ठेवला पाहिजे. ही आपली संस्कृती, आपली परंपरा आणि तो आदर ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. असे ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT