Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पालिकेत समाविष्ट गावांमधील शिक्षकांचा झेडपीच्या समायोजनावर बहिष्कार

शिक्षक संघटनांचा सीईओंच्या बैठकीवरही बहिष्कार : शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर समायोजनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) कार्यक्षेत्रातील ३८ गावांमधील ५८६ शिक्षकांसह विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी (ता.१७) आयोजित केलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. यामुळे सोमवारची शिक्षक समायोजनेची पुर्वनियोजित प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. विद्यार्थ्यांचेtudent) शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चालू शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर हे समायोजन करावे, अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली.

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातून पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३८ गावांमधील ५८६ शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. या निर्णयानुसार या सर्व शिक्षकांना सोमवारी एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बोलाविण्यात आले होते.

सध्या चालू शैक्षणिक वर्ष मध्यावर आले आहे. अशा स्थितीत शिक्षकांचे केले जाणारे हे समायोजन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे तुर्तास हे समायोजन केले जाऊ नये, अशी मागणी यावेळी सर्व शिक्षक संघटना आणि उपस्थित शिक्षकांनी केली.

महापालिका प्रशासनाने अद्याप या शाळांवर पालिकेच्या शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. त्यातच सध्या या शाळांवर कार्यरत असलेले शिक्षक अन्यत्र हलविण्यास, शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. या सर्व गावांमधून मिळून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

Kharpudi Bridge Flood : तीन दिवसांपासून पुलावरून पाणी; खरपूडी बुद्रुक-खुर्दचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना १२ किमीचा वळसा

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

SCROLL FOR NEXT