जलतरण तलाव. 
पुणे

महापालिका क्रीडा संकुले ताब्यात घेणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राजकीय दबावातून भाडेतत्त्वावर घेतलेल्या क्रीडा संकुलांच्या ठेकेदारांनीही आता महिन्याकाठचे भाडे थकवून सवलती मिळविण्याची धडपड चालविली आहे. अशा ठेकेदारांकडे पावणेदोन कोटी रुपये थकले आहेत. त्यांना वठणीवर आणण्याच्या हेतूने क्रीडा संकुले ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

थकबाकीदारांना नोटिसा दिल्याने गेल्या चार-पाच महिन्यांत ४८ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. मुळात बहुतांशी क्रीडा संकुलांचे ठेकेदार राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते असल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीत राजकीय हस्तक्षेप आडकाठी ठरण्याची भीती आहे. 

पुणे शहर आणि उपनगरांत महापालिकेची ६० क्रीडा संकुले आहेत. त्यातील सर्व ठिकाणी ठेकेदार नेमले असून, नियमावलीनुसार महिन्याकाठचे भाडेही निश्‍चित केले आहे. ते मुदतीत भरणे बंधनकारक असले तरी, त्याकडे ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

आधी थकबाकीचा आकडा वाढवायचा आणि नंतर ती भरण्याची तयारी दाखवत सवलत मिळविण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत. त्यासाठी महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हालचाली सुरू आहेत. मात्र, वाहनतळांच्या ठेकेदारांना धडा शिकविल्यानंतर थकबाकीदारांकडील क्रीडा संकुलेही ताब्यात घेण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होण्याची आशा आहे. या कारवाईच्या धाकाने काही जण भाडे भरत आहेत.

६० - वापरातील क्रीडा संकुले
२.१५ कोटी थकबाकी नोव्हेंबरअखेर
४८.१२ लाख वसूल (नोव्हेंबरअखेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT