Murder by strangling wife on suspicion of character  sakal
पुणे

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून

नगदवाडी,कांदळी येथील घटना

रवींद्र पाटे

नारायणगाव : चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरात पत्नीचा हाताने गळा दाबुन खुन केल्या प्रकरणी पतीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास नगदवाडी,कांदळी( ता. जुन्नर ) येथील शिंदे मळ्यात घडली. आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी आरोपी सुरेश दगडु शिंदे (वय ५९, वर्षे रा. शिंदेमळा, नगदवाडी ,कांदळी ता.जुन्नर जि. पुणे ) याला पळून जात असताना येथील टोमॅटो बाजारा जवळ आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या बाबत सहायक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले आरोपी सुरेश शिंदे याला दोन मुले असून ते नोकरी - व्यवसाया निमित्त बाहेरगावी रहात असतात. सुरेश शिंदे हा पत्नी संध्या (वय ५१) यांच्यासह शिंदेमळा येथे राहण्यास होते. पत्नी संध्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरेश शिंदे याला होता. या वरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. याच कारणावरून आज मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भांडणातून सुरेश शिंदे याने पत्नी संध्या हिचा गळा दाबून खून केला. त्या नंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असताना येथील टोमॅटो उपबजार आवरा जवळ त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी सुशांत सुरेश शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT