Crime 
पुणे

दारूच्या नशेत मित्राचा खून करून तलावात फेकला मृतदेह

सकाळवृत्तसेवा

जेजुरी(पुणे) : जेजुरीत किरकोळ वादातून काल मध्यरात्री दारूच्या नशेत एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह होळकर तलावात टाकण्यात आला होता.

प्रसाद मल्हारी दळवी(वय ४१ रा.जेजुरी)यांचा खून झाल्याचे जेजुरी पोलिसांनी सांगितले. काल रात्री एका बारमध्ये प्रसाद व त्याच्या मित्रांमध्ये बाचाबाजी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर भांडणे झाली. त्यानंतर होळकर तलावावर सुध्दा वादवादी सुरु होती. प्रसाद दळवी यांच्या डोक्यात मित्रांनी दगड घालून मृतदेह तलावात फेकून दिल्याचे आढळून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  


जेजुरी पोलिसांनी होळकर तलावावर वादावादी सुरु असल्याचेे व एक मृतदेह तलावात फेकल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तलावार धाव घेतली असता रक्ताने माखलेला दगड दिसला. तलावालगत उभ्या असलेल्या दुचाकी गाडीवरून प्रसाद मल्हारी दळवी यांची माहीती मिळाली. त्यावरून त्यांचा भाऊ रामदास दळवी यांच्याकडून प्राथमिक माहीती घेऊन पाण्यात शोध सुरु केला.प्रसाद बरोबर असलेले मित्र अमृत उर्फ अमर मच्छिंद्र घोरपडे (रा.जेजुरी), निरंजन उर्फ गोटया प्रदीप पवार(रा.पिंपरे,ता.पुरंदर) अशी नावे पोलिसांना समजली.

पोलिसांनी बाळू खोमणे व बबलू मुदलीयार यांच्या मदतीने वीस फुट खोल पाण्यातून गळाच्या सह्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्रसाद दळवी यांच्या डोक्यावर व तोंडावर जखमी होत्या.अमृत उर्फ अमर मच्छिंद्र घोरपडे व निरंजन उर्फ गोटया प्रदीप पवार या आरोपींचा शोध घेतला असता ते फरारी असल्याचे सांगण्यात आले. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे पोलिस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले. रामदास मल्हारी दळवी यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक सुनिल महाडिक करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT