पुणे

पुण्यात लष्कर परिसरात भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाचा खून

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्कर परिसरात भंगार गोळा करून रस्त्याच्याकडेला वास्तव्य करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्‍यावर वार करून खुन केला. ही घटना गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वृद्धाच्या खुनाचे कारण पोलिसांना अद्याप समजू शकलेले नाही. ईस्माईल शेख (वय 50, रा. न्यु मोदीखाना, लष्कर) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्माई शेख हे लष्कर परिसरात फिरून भंगार गोळा करीत होते.

त्यावरच ते त्यांची उपजिवीका भागवित होते. न्यु मोदीखाना परिसराती गाई-म्हशींच्या गोठ्याजवळच कापडाचे पाल टाकून ते तेथे राहात होते. संचारबंदी असल्याने त्यांना जेवण देण्यासाठी दररोज दुपारी एक व्यक्ती तेथे येत होती. त्यानुसार, गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संबंधीत व्यक्ती जेवण देण्यासाठी वृद्ध नागरीकाच्या पालामध्ये गेले. त्यावेळी त्यांना वृद्ध नागरीक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने शेख यांच्या डोक्‍यात जड वस्तु घालून त्यांचा खुन केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात पाठविला. अनोळखी व्यक्तीने नेमक्‍या कोणत्या कारणासाठी वृद्धाचा खुन केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT