Murder sakal
पुणे

खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या वडिलांचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या वडिलांचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली.

पुणे - खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर (Bail) सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या वडिलांचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून (Murder) करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. दोघांचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार झाले आहेत. बुधवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

सनी कुमार शिंदे (वय २२) आणि त्याचे वडील कुमार मारुती शिंदे (वय ५५, दोघे रा. शिंदे वस्ती, लोणीकंद, नगर रस्ता) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी सनी शिंदे आणि साथीदारांनी लोणीकंद परिसरात सचिन शिंदे याचा खून केला होता. त्या प्रकरणात सनीला तीन महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झाला होता. बुधवारी (१२ जानेवारी) सायंकाळी सनी आणि त्याचे वडील कुमार कारमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी शिंदे यांची गाडी अडवली.

त्यानंतर पाच ते सहा जणांनी सनीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने सनीवर हल्ला केल्यानंतर वडील कुमार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT