Murder esakal
पुणे

Pune Crime : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात सामाजिक कार्यकर्त्याचा खून

एका सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एका सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांच्यावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २) मार्केटयार्ड परिसरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.

राहुल दत्तात्रेय खुडे (वय ४०, रा. गुलटेकडी), सचिन दत्तात्रेय खुडे (वय ३८, रा. गुलटेकडी), सूरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७, रा. गुलटेकडी) आणि हनुमंत लकप्पा कांबळे (वय ३०, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब रणदिवे (वय २८, रा. आंबेडकरनगर) सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे मार्केटयार्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रासमवेत चहा पीत होते. तेथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चौघेजण आले.

रणदिवे यांनी व्हॉटसॲपवर पाठविलेल्या एका संदेशावरून चिडून त्या चौघांनी रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात रणदिवे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT