attack sakal
पुणे

माझ्या खुनाचा प्लॅन करतो काय? असे म्हणत एकावर कोयत्याने वार; आरोपी फरार

माझा खून करण्याचा प्लॅन करतो काय?असे म्हणत डोणजे येथील पायगुडेवाडी रस्त्यावर एका तरुणावर कोयते व लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

निलेश बोरुडे

माझा खून करण्याचा प्लॅन करतो काय?असे म्हणत डोणजे येथील पायगुडेवाडी रस्त्यावर एका तरुणावर कोयते व लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

सिंहगड - माझा खून करण्याचा प्लॅन करतो काय?असे म्हणत डोणजे येथील पायगुडेवाडी रस्त्यावर एका तरुणावर कोयते व लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. संजय महादेव बंडगर (वय 21, रा. नानाजी नगर, डोणजे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात सहा तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषी तांबे (रा. गोळेवाडी,डोणजे), अविनाश सांबरे (रा. सांबरेवाडी), महेश उर्फ बंटी काळे (रा. गोऱ्हे बुद्रुक) व अनोळखी तीन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून आरोपी फरार झाले आहेत. आरोपींवर अगोदरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

ऋषी तांबे व संजय बंडगर यांची ओळख असून गाडीतील पेट्रोल संपले आहे तुझी गाडी घेऊन पेट्रोल आणायला जाऊ असे सांगून तांबे याने बंडगर यास घरातून नेले. पुढे पायगुडेवाडी रस्त्यावर अगोदरच अविनाश सांबरे, बंटी काळे व इतर तिघेजण रिक्षा घेऊन थांबले होते. त्यांच्याजवळ तांबे याने संजय बंडगर यास गाडी थांबविण्यास सांगितली व तू माझ्या खूनाचा प्लॅन करत होता काय? असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रिक्षात ठेवलेले कोयते व लाकडी दांडक्यांनी बंडगर याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या जंगलात पळाल्याने संजय बंडगर या हल्ल्यातून बचावला. याप्रकरणी ऋषी तांबेसह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT