Firing 
पुणे

कानशिलात मारल्याच्या रागातून गोळी घालून खून

सकाळवृत्तसेवा

कोळवण - वाळेण (ता. मुळशी) येथे दोघांमध्ये झालेल्या भांडणात एकाने थेट बंदुकीतून गोळीबार करत दुसऱ्याचा खून केला. अजय राघू साठे (वय ४०, रा. वाळेण) असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बापू लक्ष्मण जोरी (वय २४, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) याला पौड पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय साठे (वय ४०, रा. वाळेण) हे सोमवारी (ता. १) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी वाळेण येथील ओढ्यावर घेऊन चालले होते. येथे नविन पुलाचे काम चालू असून, तेथे अजय व बापू जोरी यांची वादावादी झाली. दरम्यान, राग सहन न झाल्याने अजय यांनी बापू याच्या कानशीलात मारली. हा राग बापू याला सहन न झाल्याने त्याने घरी जाऊन घरातील बंदूक आणून अजय यांच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी झाडली. त्यात अजय जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपी बापू जोरी याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेची माहिती मिळता हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरिक्षक भालचंद्र शिंदे, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, सिद्धेश पाटील, पोलिस पाटील विवेक ढमाले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT