पुणे

खून आरोपी

CD

खून करणारा आरोपी २४ तासांत गजाआड

अहिल्यानगर, ता. १७ ः भांडगाव (ता. पारनेर) येथे सख्ख्या पुतण्याचा खून करून, तसेच घरातील रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या. महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजवळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दहा लाख २९ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
याप्रकरणी सिद्धेश संदीप खरमाळे (रा. भुजवळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीचे वडील संदीप खरमाळे यांना कोणीतरी चोरीच्या उद्देशाने डोक्यात हत्याराने मारहाण करुन जीवे मारले. तसेच घरातील १२ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू केला. तपासात हा गुन्हा महेश हनुमंत खरमाळे याने केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी भांडगाव ते जामगाव रस्त्याने दुचाकीवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पुतण्या संदीप खरमाळे याला त्याच्या राहात्या घरी जाऊन हातोड्याने डोक्यात वार करुन जिवे मारल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्या ताब्यातून दहा लाख २९ हजार रुपयांची रोकड, मोबाईल, दुचाकी, खून झालेल्या खरमाळे यांचे आधारकार्ड, एक पांढऱ्या रंगाची दोरी, असा एकूण दहा लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरिश भोये, संदीप मुरकुटे, पोलिस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, आकाश काळे, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT