पुणे

महापालिकेत 23 गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करावा; महापौर

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेत 23 गावे समाविष्ट करण्यास विरोध नाही. मात्र, एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने करावीत, अशी अपेक्षा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. 

या गावांच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करायचा असेल तर पायाभूत सुविधांसाठी साडेनऊ हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हद्दीलगतची 23 गावे महापालिकेत घेण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींबाबत महापौरांनी आपली भूमिका मांडली. 

मोहोळ म्हणाले, "" याआधी 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठीदेखील निधीची कमतरता आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे सुमारे साडेचारशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. परिणामी महापालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशावेळी नवी सर्व गावे एकाचवेळी पालिकेत घेऊन, पायाभूत सुविधा कशा देणार हा प्रश्‍न आहे. त्यामुळे नव्या गावांचा विकास करण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारने द्यावा. नव्या सर्व गावांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेनऊ हजार कोटी खर्च करणे सध्या शक्‍य नाही. यावर उपाय म्हणून या गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश केला तर आर्थिक ताण पडणार नाही तसेच विकास चांगल्या पद्धतीने करणे शक्‍य होईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT