Murlidhar Mohol Oath Ceremony Sakal
पुणे

Murlidhar Mohol Oath Ceremony : ताणलेली उत्सुकता आणि पहिलवान आला; मंत्री झाले मुरलीधर म्हणत कोथरूड मध्ये जल्लोष

मोहोळ यांचे छायाचित्र असलेल्या भगव्या रंगाच्या फुग्यांनी कार्यालयाची दर्शनी बाजू सजवली होती.

जितेंद्र मैड

कोथरूड : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर किसन मोहोळ यांनी केंद्रिय राज्यमंत्री म्हणून शपथ घेताच कोथरूड मध्ये कर्वे पुतळा चौक व मोहोळ यांच्या कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मोहोळ यांचे छायाचित्र असलेल्या भगव्या रंगाच्या फुग्यांनी कार्यालयाची दर्शनी बाजू सजवली होती. मोठ्या स्क्रीनवर शपथविधी पाहण्याची सोय करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेत असताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मोदी, मोदी, भारत माता की जय अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.भाग्यश्री बॅंडच्या तालावर, भाजपाचा झेंडा लहरवत मोठा जल्लोष सुरू झाला. दिवसभर कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आले.

मोहोळ यांच्या आई वेणुबाई, पत्नी मोनिका मोहोळ, मुलगी सिध्दी, सौम्या, मित्रमंडळी प्रत्यक्ष शपथविधी सोहळा पाहण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.आयुष्यभर जे कष्ट केले त्याचे चीज झाले. भाऊजी मला आई म्हणूनच आवाज देतात .कोरोना काळात लोकांची सेवा करताना दोन वेळा कोरोना झाला तरी ते स्वस्थ बसले नाहीत. खुप खुप आनंद झाला आहे.

संगिता मोहोळ (थोरल्या वहिनी)

माझे काका आज केंद्रात मंत्री झाले आहेत. येथे कार्यालयात कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने जमले आहेत. सर्वांना खुप आनंद झाला आहे. आता आम्ही सगळे जल्लोष करणार आहेत.

-पुजा मोहोळ - रेणुसे (पुतणी)

ताणलेली उत्सुकता आणि पहिलवान आला

शपथविधी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मोहोळ यांच्या कार्यालयापाशी जमले होते. एकेकाचे नाव पुकारले जात होते तसतसे आपला नेता कधी येईल याची उत्सुकता वाढली होती. पाऊस आला तरी लोक थांबून होते.

आणि तो क्षण आला. आणि एकच जल्लोष ‌ झाला. फटाक्यांची आतषबाजी, हलगी आणि बॅंड घ्या तालावर लोक थिरकू लागले. पहिलवान आला, अपना मुरलीधर या गीताने जोर धरला. काय म्हणतात पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर हा फलक उंचावून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT