Museum of Zapurza Art and Culture inaugurated in Pune 19th May sakal
पुणे

पुण्यात साकारले गेले ‘झपूर्झा’ कला व संस्कृतीचे संग्रहालय, १९ मे रोजी उद्घाटन

देशाच्या सांस्कृतिक व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे ‘झपूर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात साकारण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाच्या सांस्कृतिक व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे ‘झपूर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात साकारण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९ मेपासून ते सर्वांसाठी खुले होत आहे, अशी माहिती झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक व पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी मंगळवारी (ता.१७) दिली. ‘झपूर्झा’ ची संकल्पना काय आहे आणि त्याचा प्रवास मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती गाडगीळ यांनी दिली. डॉ. रेणू गाडगीळ, पीएनजी सन्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक, सीएफओ आदित्य मोडक, कलाकार राजू सुतार आणि विनय नारकर यावेळी उपस्थित होते.

पुण्यात एनडीए रस्त्यावर पीकॉक बेच्या पुढे कुडजे येथे आठ एकर परिसरात ‘झपूर्झा’ साकारले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित गाडगीळ यांनी देशाच्या विविध भागांतून जमविलेल्या व वारसा ते मॉडर्न आर्ट प्रकारातील चित्र-हस्त-शिल्प-छायाचित्र आदींची प्रदर्शने आणि ललित कलांचे सादरीकरण, कार्यशाळा व चर्चासत्रे येथे होणार आहेत.

देशातील पहिला टेक्स्टाईल आर्ट बिनाले

वर्ल्ड टेक्स्टाइल आर्ट सुरू होऊन २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदा टेक्स्टाइल आर्ट बिनाले पुण्यात झपूर्झा येथे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये करण्याचा मानस आहे. येथे टेक्स्टाइल आर्टमधील जागतिक पातळीवरील कलाकार सहभागी होत असून, यात पारंपरिक ते मॉडर्न टेक्स्टाइल आर्ट पाहता येईल, असे गाडगीळ यांनी सांगितले.

‘झपूर्झा’त काय पाहायला मिळणार?

  • संग्रहालयात २०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रीयन दागिने

  • चांदीच्या जुन्या कलात्मक वस्तू, नाणी

  • १५० वर्षांपूर्वीच्या ३०० पैठण्या-शेले-फेटे-टोप्या

  • लहान मुलांचे पोशाख

  • विविध राज्यांतील पुरातन वस्त्रे

  • दुर्मिळ-वारसा असणाऱ्या वस्तू

  • विविध प्रकारचे दिवे, पुतळे, पोथ्या, ताम्रपट,

  • राजा रविवर्मा लिथोग्राफ्स पासून ते मॉडर्न आर्टमधील एम.एफ हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रे

गुरुवारी उद्घघाटन

  • ‘झपूर्झा’ चे उद्घघाटन १९ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी प्रसिद्ध गायिका रेवा

  • नातू यांचे गायन, शर्वरी जमेनीस यांचे नृत्य, आनंद भाटे यांचे गायन तसेच दिग्दर्शक अतुल व पूर्ण पेठे यांचे ‘अडलंय का’ नाटक, इर्शाद, शेखर नाईक यांचा अमृता शेरगील यांच्यावरील कार्यक्रम आणि, पं. अतुलकुमार उपाध्ये

  • आणि विजय घाटे यांचा बहारदार कार्यक्रम होतील. उद्घाटनानिमित्त १९ ते २२ मे दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहे.

दागिने बनवणे ही कला आहे, त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून पीएनजी सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत कलाकारांना मोफत कलादालने उपलब्ध असून, ‘झपूर्झा’ हे त्याचे व्यापक स्वरूप आहे. लहान वयापासूनच कलेची आवड निर्माण व्हावी व आपली संस्कृती समजण्यासाठी झपूर्झाची निर्मिती केली आहे. येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी पाहण्यासाठी व शिकण्यासाठी काही ना काही आहे. तसेच, सातत्याने नवीन वस्तू पाहायला मिळणे व कलांचे प्रशिक्षण, हे झपूर्झाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच देश-विदेशातील कलाकार व संग्रहालयाच्या माध्यमातून आणखीन नव्या गोष्टी येथे सादर होतील.

- अजित गाडगीळ, संस्थापक, झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT