पुणे

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा सत्कार संपन्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संगीताच्या दुनियेत येऊन आज २५ वर्षे कशी पूर्ण झाली हे कळलेच नाही. या संपूर्ण प्रवासात दिग्गज कलाकार, संगीतकारांचे आशीर्वाद, रसिकांची दाद हीच खरी कौतुकाची थाप होती. जगभर प्रवास केला आणि विविध आवाज ऐकले. पण आयुष्यातील सगळ्यात छान आवाज ऐकला तो रसिकांच्या टाळ्यांचा. भविष्यातही हा आवाज ऐकायला मिळत राहावा.’’ अशा भावना व्यक्त केल्या संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी. (Musician Dr Salil Kulkarni Hospitality)

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे डॉ. कुलकर्णी यांच्या सांगितिक वाटचालीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष प्रवीण बर्वे, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, दीपक पवार आदी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘डॉक्टरी करावी की संगीत क्षेत्रात यावे हा प्रश्‍न सुरवातीच्या काळात होता. मात्र संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या सल्ल्याने सांगितिक क्षेत्रात आलो. लहानपणी अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण केली असे वाचले होते. आपल्याविषयी ही कुणीतरी असे बोलेल याची कल्पना नवती. पण पेटी घेऊन गाता-गाता हा प्रवास सुंदर घडत गेला.’’

प्रशांत दामले म्हणाले, ‘‘सामान्य माणसालाही गुणगुणता येतील अशा प्रकारच्या गाण्यांची निर्मिती सलील यांनी केली आहे. या क्षेत्रात सातत्य राखणे अवघड आहे, पण सलील यांनी ती लिलया पेलली आहे. आयुष्यातील गंभीर गोष्टी हसतखेळत रसिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा आहे. एकट्याने कला सादर करताना त्यातील चुका समजणे आणि त्या सुधारण्याचे गुण ही त्यांच्यात दिसतात.’’

यावेळी कोथरूड शाखेच्या उपक्रमांची माहिती सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन रत्ना दहिवलीकर यांनी केले. मानपत्र लेखन निखिल हिरुलकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT