Aditya Thackeray  Sakal
पुणे

Aditya Thackeray : नागरिकांचे झालेले नुकसान भरून निघेल का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला प्रश्न

25 जुलै रोजी एकता नगरी परिसरात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - नागरिकांना सांगितलं त्यापेक्षा जास्त पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तळमजला, पहिला मजला पाण्यात गेला, त्यामुळे नागरिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाले; मात्र यातून नागरिकांचे झालेले नुकसान भरून निघेल का? नागरिकांना कायमस्वरूपी उपाययोजना मिळालीच पाहिजे, असे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

25 जुलै रोजी एकता नगरी परिसरात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. नदी सुधार प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. तरीही हे काम करण्यात आले. गुजरात मधील नद्या वेगळ्या आहेत तर महाराष्ट्रातील नव्या वेगळ्या आहेत. इथल्या नद्यांचा अभ्यास करून काम करणे अपेक्षित होते.

पुणे महापालिकेत अद्यापही नगरसेवक नाही. निवडणुका झाल्या नाहीत. राडारोडा टाकला जातो त्यावर कोणाचेही अंकुश नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे मात्र ती मंजूर कधी होणार त्याला पुरेसा निधी उपलब्ध होणार का? नेमक्या कशा करणार आहेत याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता मिळाली नाही.

व्यवसायिकांसाठी पूररेषा बदलली आहे चुकीचे निकष बऱ्याच ठिकाणी लावले गेले आहेत या सगळ्याची आधी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आदित्य ठाकरे यांनी परिसरातील सोसायटीच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT