mutha riverbase street light close sakal
पुणे

Street Light : नदीपात्रातील पथदिवे बंद असल्याने रस्ता धोकादायक

मुठा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील भिडे पूल ते रजपूत वस्ती दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुठा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील भिडे पूल ते रजपूत वस्ती दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला. हा पूर ओसरून चारपाच दिवस झाले तरीही महापालिकेच्या विद्युत विभागाने या रस्त्यावरील पथदिवे अद्याप सुरु न केल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. खड्डे व पाण्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत ४५ क्यूसेस पाणी सोडण्यात आले. त्‍यामुळे नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या सोसायटी, वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. पूर ओसरल्यानंतर महापालिकेने मदतकार्य केले. पण रोज हजारो दुचाकीस्वारांची गर्दी असणाऱ्या नदी काठच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

नदीला पूर आल्याने महापालिकेने जयंतराव टिळक पूल ते रजपूत वस्ती दरम्यानच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद करू टाकला. नदीचा पूर ओसरून चारपाच दिवस झाले. आत्तापर्यंत टिळक पूल ते भिडे पूल या दरम्यानचे पथदिवे सुरु केले आहेत. पण भिडे पूल ते रजपूत वस्ती हा रस्ता अजूनही अंधारात आहेत.

या रस्त्यावर खड्डे पडेल आहेत. पुरामुळे खडी वाहून गेली आहे, तर काही ठिकाणी अजूनही पाणी असल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. या ठिकाणी अंधारात दुचाकीस्वार घसरून अपघातही झाले आहेत. तरीही महापालिकेने अद्याप पथदिवे सुरु केलेले नाहीत.

अधिक्षक अभियंता मनिषा शेकटकर म्हणाल्या, ‘नदीला आलेल्या पुरात काही खांब वाहून गेले आहेत. त्यामुळे पथदिवे सुरु केलेले नाहीत. याठिकाणी त्वरित दुरुस्तीचे काम केले जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT