पुणे

जहाजावरील दोन भारतीयांना नेदरलँडमध्ये हलविले

CD

ॲमस्टरडॅम, ता.११ (वृत्तसंस्था) ः हंटा विषाणूचा प्रादुर्भाव आढळलेल्या ‘एमव्ही होंडियस’ या डच जहाजावरील दोन भारतीय कर्मचारी सुरक्षित असून त्यांना नेदरलँडमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती स्पेनमधील भारतीय दूतावासाने रविवारी (ता. १०) दिली.
‘ओशनवाईड एक्सपेडिशन्स’द्वारे चालवले जाणारे हे आलिशान जहाज १ एप्रिल रोजी अर्जेंटिनातील उशुआया येथून निघाले होते. जहाजावर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हे जहाज स्पेनच्या कॅनरी बेटावर पोहोचले. या जहाजावर दोन भारतीय कर्मचाऱ्यांसह सुमारे १५० जण होते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि स्पेनच्या प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार सर्व प्रवाशांना जहाजावरून उतरविण्यात आले. स्पेनच्या राष्ट्रीय आपत्कालीन देखरेख आणि समन्वय केंद्राने (सीईएनईएम) दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भारतीय कर्मचाऱ्यांना नेदरलँडमध्ये हलविण्यात आले आहे. तेथे त्यांना आरोग्य सुरक्षा नियमांनुसार विलगीकरणात ठेवण्यात येईल. स्पेनमधील भारताचे राजदूत जयंत एन. खोब्रागडे हे स्पेनचे प्रशासन आणि दोन्ही भारतीयांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या सुरक्षिततेची खातरजमा करत आहेत.

निर्जंतुकीकरणावर भर
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधोनोम गेब्रेयेसूस यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञांचे पथक स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर काम करीत आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान निर्जंतुकीकरण आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT