धाराशिव जिल्ह्यातील
काही भागांत गूढ आवाज
धाराशिव, ता. ८ : जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी (ता. आठ) सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी भूगर्भातून मोठा आणि गूढ आवाज आल्याने नागरिकांत घबराट पसरली. अचानक झालेल्या आवाजामुळे तुळजापूर आणि लोहारा तालुक्यांतील अनेक गावांमधील घरांच्या खिडक्यांची तावदाने मोठ्या प्रमाणावर थरथरली. तसेच, काही सेकंद जमीन हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, भूकंप झाल्याची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही, असे लोहाराचे तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी सांगितले.
तुळजापूर तालुक्यातील बहुतांश भागांत सकाळी दहाच्या सुमारास मोठा गूढ आवाज झाला. तुळजाभवानी मंदिरात आवाजाची जाणीव अनेकांना झाली. अनेक ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा गूढ आवाज झाल्याचे जाणवले. जेवळीसह परिसरातील गावांमध्ये सकाळी १० वाजून २२ मिनिटांच्या सुमारास भूगर्भातून अचानक मोठा गूढ आवाज होऊन काही सेकंद जमीन हादरली. या धक्क्यामुळे घरांवरील छत व खिडक्यांची तावदाने थरथरली. इटकळ आणि परिसरात सकाळी १०ः२१च्या सुमारास मोठ्या स्फोटासारखा गूढ आवाज काही सेकंद आला. यामुळे घरांवरील पत्रे, खिडक्या, घरातील भांडी काही सेकंद थरथरली.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.