पिंपरी, ता. २९ : गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील एका बंद सदनिकेत छत्रपती संभाजीनगरमधील ३४ वर्षीय महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.
मुग्धा अविनाश देशमुख असे मृत महिलेचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या त्या कन्या आहेत. मुग्धा या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, त्यांनी ऑगस्टच्या अखेरीस लंडन सोडल्याचे समोर आले. २३ ऑक्टोबरला आईशी फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. याबाबत कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर बँक खात्यातील ऑनलाइन व्यवहार आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डरच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्यांचा माग काढला. २८ ऑक्टोबरला रात्री संभाजीनगर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सहकार्य घेऊन लोढा बेलमोंडो येथील बंद सदनिकेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुग्धा या भारतात कधी परतल्या, त्या कोणाच्या संपर्कात होत्या, त्यांच्याबरोबर आणखी कोणी राहत होते का, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.