पुणे

पीवायसी बॅडमिंटन लीग

CD

पीवायसी क्लब ः पीवायसी बॅडमिंटन लीगमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या नाडगोंडे रेव्हन्स संघाचे खेळाडू आनंद व्यक्त करताना.
-----------------

नाडगोंडे रेव्हन्स संघाने पटकाविला जेतेपदाचा मान
पीवायसी बॅडमिंटन लीग

पुणे, ता. १३ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन लीगमध्ये नाडगोंडे रेव्हन्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघाचा रंगतदार सामन्यात ४-३ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
पीवायसी क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेच्या वरिष्ठ गटात अंतिम फेरीच्या लढतीत गोल्ड खुल्या दुहेरी एकमध्ये रेव्हन्स संघाच्या प्रतीक धर्माधिकारी व केदार नाडगोंडे जोडीने टायगर्सच्या ईशान लागू व निखिल चितळे जोडीचा १५-११, १५-१२ असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर खुल्या दुहेरी तीनमध्ये टायगर्स संघाच्या मिहिर विंझे व प्रीती सप्रे जोडीने मनीष शहा व प्रांजली नाडगोंडे जोडीचा १५-३, १५-७ असा पराभव करून १-१ अशी बरोबरी साधली. प्रौढ दुहेरी चारमध्ये टायगर्स संघाच्या आमोद प्रधान व आनंद घाटे जोडीने अफलातून खेळ करताना अविनाश दोशी व समीर सावला जोडीचा १६-१४, १७-१५ असा पराभव करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. प्रौढ दुहेरी पाचमध्ये रेव्हन्स संघाच्या चंद्रशेखर आपटे व विश्वास मोकाशी जोडीने बाळ कुलकर्णी व परीक्षित देवल जोडीचा २०-१८, १५-९ असा पराभव करून २-२ अशी बरोबरी केली. खुल्या दुहेरी सहामध्ये टायगर्स संघाच्या कर्णा मेहता व यश मेहेंदळे जोडीने आशय कश्यप व विनीत राठी या जोडीचा चुरशीच्या सामन्यात ११-१५, १६-१४, १५-१३ असा पराभव करताना संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. खुल्या दुहेरी सातमध्ये रेव्हन्स संघाच्या चिन्मय चिरपुटकर व पृथ्वी शहा जोडीने अभिषेक ताम्हाणे व तनिश बेलगलकर जोडीला १५-१२, १५-८ असे नमवित ३-३ अशी बरोबरी केली तर निर्णायक लढतीत मिश्र दुहेरी दोन मध्ये रेव्हन्स संघाच्या रिआन करंदीकरने सारा नवरेच्या साथीत जोरदार खेळ करताना तन्मय चोभे व नेहा लागू जोडीवर १५-७, १२-१५, १५-१० असा विजय प्राप्त करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
या स्पर्धेतील विजेत्या नाडगोंडे रेव्हन्स संघाला करंडक व पदके देण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, आमोद प्रधान हे उपस्थित होते.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT