खोडद, ता. १८ : नागपंचमीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ले नारायणगडावरील गडदेवता हस्तमातेच्या यात्रोत्सवानिमित्त सोमवारी (ता. १७) मोठ्या संख्येने भाविकांसह पर्यटकांनी हस्तमातेचे दर्शन घेतल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी धर्मदाय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र वामन यांनी दिली.
ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या खोडद (ता. जुन्नर) येथील किल्ले नारायणगडावर नागपंचमीनिमित्त परिसरातील भाविक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. खोडद गावाजवळ किल्ले नारायणगड पूर्व पश्चिम असा विस्तारलेला आहे. गडाच्या पूर्व व पश्चिम या दोन्हीही टोकदार शिखरांमुळे चोहोबाजूंनी हा किल्ला लक्ष वेधून घेतो.
नारायणगडावर दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नागपंचमीच्या निमित्ताने भाविकांनी मुकाई माता व गडदेवता हस्तमाता देवीचे दर्शन घेतले.
यावर्षी नागपंचमीनिमित्त गडाचीवाडीमधील विठ्ठल रुक्मिणी धर्मदाय ट्रस्ट व गडाचीवाडी ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी (ता. १७) नागपंचमीच्या दिवशी सकाळी पालखी पूजन, मांडव डहाळे, चोळी पातळ यांची मिरवणूक काढून घागरी व पालखीचे वाजत गाजत नारायणगडावर प्रस्थान झाले. अभिषेक, होमहवन, आरती अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. महिलांनी पायथ्याजवळ असलेल्या मुकाई देवीला आणि गडावरील हस्त मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत मुकाईमाता मंदिर प्रांगणात तुऱ्यावाले बाळासाहेब पवार गंगेवाडी व कलगीवाले शिवाजी पवार कवठे - यमाई यांचा भेदिक कलगी तुऱ्याचा जंगी सामना रंगला. अनेक रसिकांनी या कलगी तुऱ्याचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.