NGS26B00374
नागणसूर ः शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
जेऊर शाळा व्यवस्थापन समितीची निवड
नागणसूर : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा जेऊर येथे २०२६ ते२०२८ या शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्ता वाढविणे व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठीत करण्यात आली. पालक सभेत नवीन समितीची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून इरण्णा शरणप्पा चौलगी, उपाध्यक्ष कमलाबाई स्वामी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून अश्विनी हिप्परगी, प्रीती हत्तरसंग, सुष्मा मुस्के, बिस्मिल्ला कोरबू, सोमनिंग पुजारी, सूर्यकांत निंबाळ, पंडित गुरव यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. समितीच्या बैठकीत शैक्षणिक दर्जा उंचावणे, पायाभूत सुविधा सुधारणा, स्वच्छता अभियान, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. नव्याने निवडलेल्या अध्यक्षांनी सांगितले. याप्रसंगी जेऊरचे उपसरपंच काशिराया पाटील, पोलिस पाटील रेहमान आत्तार, मुख्याध्यापक अमसिद्ध उमराणी, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पाटील, मावळते अध्यक्ष सिद्धाराम कापसे हे सर्वजण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.