पुणे

नागेबाबा मंदिर विकासासाठी दोन कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर

CD

नागेबाबा मंदिर विकासासाठी
अडीच कोटीचा निधी मंजूर
कुकाणे, ता. ३१ ः भेंडे बुद्रुक येथील श्री संत नागेबाबा मंदिर परिसर विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांना २ कोटी ५२ लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी केला आहे. यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांची अंदाजपत्रके व इतर कागदपत्रांची तपासणी करून समितीने विकास कामांकरिता निधीची शिफारस केली आहे. त्यानुसार सदर यात्रास्थळाच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधीतून "श्री क्षेत्र नागेबाबा गोसावीचे देऊळ, या ‘ब’ वर्ग यात्रास्थळाच्या ठिकाणी एकूण दोन कोटी ५२ लाख ५९ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यामध्ये सभामंडप बांधकाम (२ कोटी रुपये), रेनवॉटर हार्वेस्टिंग (१ लाख रुपये), रुफ टॉप सोलर (१० लाख रुपये), हँडिकॅप रॅम्प (२ लाख रुपये), विद्युतीकरण (१७ लाख १ हजार ८५६ रुपये), अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना (२० लाख रुपये), वाहनतळ विकास (२ लाख ५७ हजार ५०० रुपये) या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

'एक होती चिऊ एक होता काऊ...' डॉ. नेनेंसाठी हे सातारी शैलीत माधुरीचा हटके उखाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Karjat Tree Felling: कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही;वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT